माया येथे सद्गुरुच सांभाळतात शेवटी. अंतकळीचा बा पांडुरंग म्हटले आहे ते खरे आहे. अंतकाळी ते धाव घेणारच, तुमचे संरक्षण करणारच, तुम्हाला सानिध्यात घेणारच, पण सतशुद्ध असेल तरच ! अशुद्ध असेल तर कसे घेतील?
म्हणून अंतरंगाच्या तरंगाला जर वाटले की ज्योत तशा तऱ्हेची आहे मग तळमळीने सांगतात, आता या ज्योतीला पुन्हा जन्म नको. आपल्या येथील योगिनींच्या बाबतीत आम्हीच गुरुदेवांना सांगितले की आता तीला पुन्हा जन्म नको. भोग भोगले ते बस झाले. परंतु आम्ही तुम्हाला एकच सांगतो स्थूल सुटले की या ज्योतीला आपण आपल्या गुरुकुलात घेऊन चला. पुन्हा जन्म नको. पण पुन्हा या तरंगाच्या तरंगानी मायेत खेचता उपयोगाचे नाही.
तरंग हे सतमय असले पाहिजेत त्यात जरा सुद्धा किल्मिष असता कामा नये. अंतरंगातले तरंग कसे पाहिजेत? तर सतमय, सद्गुरुंच्या ठिकाणी असले पाहिजेत. नुसती दृष्टी फिरली की सद्गुरू मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे.
माझ्या समोरच सत आहेत हे पाहिल्या नंतर मनाची ठेवण इकडे तिकडे होणे शक्य नाही. सत हे सतच राहणार, स्थिर राहणार, तेच शांत तेच गतिमान.
शुभ्र प्रकाशात, वर्तुळात, बिंदूत पाठवितात. ज्योत बिंदूच्या आत जाऊन समाधिस्त होते, आपल्याच अंतरंगातून आपल्याला ध्वनी मिळतो. असे करत करत ज्योत अनंतांच्या सानिध्यात जाते. सानिध्यात घेणे ही त्यांचीच कृपा आहे.
पण केव्हा घेतील? अंतरंगात तरंग तन्मय होतील तेव्हाच ते आपल्याला जवळ घेतील अन्यथा घेणार नाहीत.
तात्पर्य काय हा विषय साधा नाही ज्ञानाचा विषय आहे. सतमय गतीने वाटचाल करताना इतकी धन्यता वाटेल, जाणीव मिळेल, अन लिनतेने उद्गार निघतील किती भाग्यवान आहे मी! आज मी प्रत्यक्ष परब्रम्ह गती पाहतोय, अनुभवतोय. क्रमशः