तन सताने दिधलेले आहे, मन सताने दिधलेले आहे, धन सताने दिधले आहे. ते कर्तव्यासाठी दिधले आहे. मानवाने त्याचा यथायोग्य वापर केला पाहिजे.
तन मिळाले म्हणून त्याची कशीही स्थिती करणे यथायोग्य नाही. मनाची यथायोग्य स्थिती केली पाहिजे अन् धनाचाही यथायोग्य उपयोग केला पाहिजे.
मानवी स्थिती प्रमाणे सताने तुम्हांस माया हे धन अशी स्थिती दिधलेली नाही. त्या खेरीज तुम्हाला एक फार मोठे धन दिधलेले आहे. मायावी धन तुम्हापासून कोणीही हिरावून घेऊ शकेल परंतु सताने समर्पित केलेले धन कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मग सताने दिधलेले धन श्रेष्ठ आहे ना? परंतु मानवाला ह्या धनाची किंमत कळत नाही, परंतु मायावी धनाची किंमत कळते. कारण मानव समजतो कि मायावी धन त्याने कमविलेले आहे.
जर मानवात सताने वास केला नसता तर तो हे मायावी धन कसा बरे कमवू शकेल? वास्तविकतेत जर मानवाची अशी धारणा असेल तर तो सतापासून दूर जावू शकणार नाही.
सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधलेली आहे पण आपण ते जाणीवेत ठेवले नाही. कोणतीही स्थिती असो, कलियुग स्थिती असो नाहीतर आर्यवर्त असो. कलियुग कशामुळे प्राप्त झाले? याची जाण सताने आपणास दिधलेली आहे. कलियुग असून देखील सत् कर्तव्य परायणता साधत होते ना? अशा सताच्या स्थितीतील आपण मानवी ज्योती आहात. मग याची जाण आपणास असावयास, यावयास हवी.
सतानी आपणास जे तन, मन, धन दिले आहे ते कर्तव्यासाठी. कर्तव्य करीत असताना सेवेक-याने दृढ:निश्चयी राहिले पाहिजे.
आपणात असणाऱ्या "मी" ची जाण घेऊन कर्तव्य केले तरच भक्त सत् शुद्ध होऊ शकतो. अन् अशा भक्तांपाशी संयमता अन् लिनता वास करून राहते. असा भक्त सताला सांगू शकतो, *"आहे हे सर्व आपूलेच आहे. आपण आम्हास ते कर्तव्या करीता प्रदान केले आहे. आम्ही केवळ निमित्त आहोत."
* हा पंचमहाभूताचा देह परमात्म्याने निर्माण केलेल्या निसर्गाशी संधान ठेऊन राहिला अन् त्याचा कर्तव्यासाठी यथायोग्य स्थितीने वापर केला तरच तो शुध्द राहिल. हा मानवी देह असेपर्यंत क्षणिक मायेला न भूलता सद्गुरूंनी आपणास जे अमूल्य धन प्रदान केले आहे येणे जे "अखंड नाम" बहाल केले आहे, त्याबरोबर तन्मयता साधल्यास सद्गुरु आपणापासून कधीही दूर जाणार नाहीत.
टायपिंग: श्री सुभाष भोसले