"ही लढाई सत्य असत्यासाठी आहे. तू कोण? मारविता कोण? वगैरे सांगून विराट रूप दाखविले व हे सर्व खेळ मी अनंताचा अनंत करीत आहे." कृष्णाने अर्जुनाला शुद्धीवर आणून ठणकावले कि, "तुझ्याकडून हे युध्द करून घेणार आहे."
तेव्हा अर्जुन लढाईला उभा राहिला. पण अर्जुनाला बाण लागला नाही. कृष्णाने सारथ्याचे काम केले. त्याच्या
रथाच्या वरती रूद्र मारूती होता. म्हणून रथ उडत नव्हता.
इतके सर्वस्व घडविले, पण द्रोण, भीष्म कठीण होते. द्रोण ही सामान्य ज्योत नव्हती. कृष्णाने कारस्थाने केली. त्याने भीमाला बोलावले व सांगितले अश्वत्थामा हत्तीला ठार मारणे. ठार मारल्यानंतर कृष्ण धर्माजवळ आले. आकाशपाताळ एक केले व धर्म राजाला म्हणाले, "अश्वत्थामा लढाईत पडला हे आम्ही सर्वत्र पसरविणार. तेव्हा द्रोण तुझ्याकडे येईल, तेव्हा तू फक्त असे म्हण कि, "अश्वत्थामा लढाईत पडला. मनुष्य किंवा हत्ती माहित नाही."
कृष्णाने सत्यासाठी लबाडी केली. पण कृष्ण तेथेच अव्यक्त राहिले. द्रोणाना कळताच ते धर्माजवळ आले. अन् धर्माला म्हणाले धर्मराज अश्वत्थामा लढाईत पडला हे खरे आहे काय? तेव्हा कृष्णाने धर्माला श्रवणी दिली. धर्माने सांगितले, "अश्वत्थामा लढाईत पडला."
तेव्हा द्रोणाचार्याना बाणाने मारले. भीष्मांची तसेच कर्णाची गती केली. कर्ण हा पांडव होता. पण अघोराकडे सानिध्य.
कर्ण खरा दानशूर होता. कवचकुंडले मागितली. कृष्णाने पृथ्वीला आदेश दिले तू दुभंग हो. तेव्हा कर्णाच्या रथाची चाके जमीनीत रूतली. कृष्ण म्हणाले, "कर्णा तू एका साध्वीची वस्त्रफेड होताना खाली मान का घातलीस?"
महाभारत संपल्यावर कृष्णराज यादवकुलोत्पन्न होते; यादव उन्मत्त झाले. त्याने समाधी अंगाने आपली काया स्थिर केली. सत्यासाठी झगडले. कृषणावतारात त्यांनी याप्रमाणे कार्य केले.
आता कलीयुगात सद्गुरु तत्वाने कार्य करीत आहेत. नीती तत्वाने जाण्यास सद्गुरु सांगत आहेत. सत् हे सतासाठी झगडणारे आहे. ते निर्भीड, सत्य अन् सात्विक आहे. *सत्या परता नाही धर्म!* ज्याच्या जवळ सत्य धर्म नाही तो मुक्तिस कसा जाणार? 24 ऑगस्ट
